“रोज धमक्या येतात, कधी कोण येऊन माझा मुडदा पाडेल सांगता येत नाही…”; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट अन् मोठी घोषणा!

बीड (प्रतिनिधी): “माझ्या कुटुंबाला मी डावावर लावलंय… मला रोज मारण्याच्या धमक्या येतात, कधी कोण येऊन माझा घात करेल आणि संपवून टाकेल, याची मलाच कल्पना नाही. पण, मी समाजासाठी मैदानात उतरलोय, या मरण-बिरणाला मी भीक घालत नाही!” अशा अत्यंत रोखठोक आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. करमाळा … Read more

पालवण–लिंबागणेश रस्त्याचा १३ कोटींचा ‘खड्डेमार्क’ कारनामा! बेशरम कंत्राटदारांवर ग्रामस्थांचा अनोखा निषेध; ग्रामसडक योजना ‘राजकीय पोसणी’साठीच?

बीड लिंबागणेश (दि. ४ नोव्हेंबर) — मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील पालवण चौक ते लिंबागणेश हा २४ किलो मीटर लांबीचा रस्ता बनवण्यासाठी तब्बल १२ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र काही महिन्यांतच हा रस्ता उखडून खड्डेमय झाला आहे. या रस्त्याची दुर्दशा पाहून स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश … Read more

बीडच्या डॉक्टर लेकीला न्याय मिळवण्यासाठी बजरंग बाप्पा अमित शाहांना भेटणार; महादेव मुंडेप्रकरणावर सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल!

बीड (प्रतिनिधी): महादेव मुंडे यांच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या प्रकरणावर सुप्रिया सुळे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विशेषत: बीडच्या डॉक्टर लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी त्या केंद्र आणि राज्य सरकारकडे आग्रह करत आहेत. सुप्रिया सुळे यांनी महादेव मुंडे प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला सडेतोड शब्दांत आक्षेप घेतला. त्यांनी महाराष्ट्राच्या नागरिकांच्या न्याय हक्कासाठी SIT स्थापन … Read more

तलवाडा एसटी बसस्टँडमध्ये एखादा जीव गेल्यावरच एसटी महामंडळ जागे होणार का?

तलवाडा (ता. गेवराई) | हॅलो बीड प्रतिनिधी गेवराई तालुक्यातील सर्वात मोठं व व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचं गाव असलेल्या तलवाडा येथील एसटी बसस्टँडचा ‘पार्किंग ठिकाण’ म्हणून वापर सुरू झाल्याने प्रवासी आणि चालक त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायत मार्केटलगत असलेल्या दोन फ्लॉटफॉर्मयुक्त बसस्थानकात व्यापारी, बँक ग्राहक आणि वाहनधारक आपली खाजगी वाहने थेट स्टँडमध्ये उभी करतात, अशी गंभीर परिस्थिती निर्माण … Read more

‘ती बीड जिल्ह्याची म्हणून…’; सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर धनंजय मुंडेंचं मोठं विधान

साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. या प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रभर उमटू लागले असून, या घटनेत बीड जिल्ह्याचा उल्लेख वारंवार होत असल्यामुळे बीडकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना सांत्वन केले आणि या प्रकरणात सखोल चौकशीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंडे … Read more

गोट्या गीतेसह पाच जणांवरील मोका रद्द – रघु फड, धनराज गित्ते यांच्यावर कारवाई कायम

बीड : परळी शहरात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या सहदेव सातभाई यांच्यावर झालेल्या हल्ला व लूटमारीच्या प्रकरणाला मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात कुख्यात गुन्हेगार रघु फड याच्यासह सात जणांवर मकोका (Maharashtra Control of Organised Crime Act – MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता अपर पोलिस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार टोळीतील गोट्या गीते याच्यासह पाच जणांवरील … Read more

बीड रेल्वे स्थानकावर दुसऱ्याच दिवशी अव्यवस्था! प्रवाशांची नाराजी – स्वच्छता व सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

बीड: तब्बल चार दशके वाट पाहिल्यानंतर बीड जिल्ह्याचे स्वप्नवत रेल्वे स्वप्न १७ सप्टेंबर रोजी पूर्ण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत बीड – अहमदनगर रेल्वे मार्गावरील पहिली रेल्वे गाडी धावली. बीडकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता. परंतु उद्घाटनाचा आनंद दुसऱ्याच दिवशी धक्का बसला. स्थानक परिसरात कचरा, … Read more

बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका – कपाशी पिकांचं मोठं नुकसान

बीड : बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. जोरदार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून अनेक ठिकाणी पाण्याखाली रस्ते गेले आहेत. माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आला असून परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांवर या पावसाचा मोठा फटका बसला आहे. विशेषतः कपाशी पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून उत्पादन घटण्याची … Read more

बीड-नगर रेल्वेचे उद्घाटन; पंकजा मुंडेंचा टोला – ‘पेरलं कुणी, मशागत कुणी केली, कापणीला बजरंग बाप्पा आले’

बीड : बीडकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गाचा आज भव्य सोहळ्यात शुभारंभ करण्यात आला. या ऐतिहासिक क्षणासाठी हजारो नागरिक, राजकीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र या उद्घाटन कार्यक्रमात श्रेयवादावरून रंगलेले राजकारणही स्पष्ट दिसून आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध पक्षांचे बॅनर, फेस्टून, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी यामुळे कोणाचे योगदान अधिक, कोणाला श्रेय द्यायचे यावरून राजकीय … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्र वाटप; मराठा बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण

बीड – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून बीड जिल्ह्यात ऐतिहासिक असा कार्यक्रम पार पडला. बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मराठा समाजातील पात्र बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांची, मराठा बांधवांची आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाच्या भावनांना … Read more