“रोज धमक्या येतात, कधी कोण येऊन माझा मुडदा पाडेल सांगता येत नाही…”; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट अन् मोठी घोषणा!

बीड (प्रतिनिधी): “माझ्या कुटुंबाला मी डावावर लावलंय… मला रोज मारण्याच्या धमक्या येतात, कधी कोण येऊन माझा घात करेल आणि संपवून टाकेल, याची मलाच कल्पना नाही. पण, मी समाजासाठी मैदानात उतरलोय, या मरण-बिरणाला मी भीक घालत नाही!” अशा अत्यंत रोखठोक आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. करमाळा … Read more

बीड हादरलं! डोळ्यात मिरची टाकून सराफाला भरदिवसा लुटलं; अंबाजोगाईतील ‘सिनेस्टाईल’ दरोड्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराट

बीड (प्रतिनिधी): जिल्ह्यात गुन्हेगारांचे धाडस इतके वाढले आहे की, आता भरदिवसा आणि गजबजलेल्या मार्गावरही लोक सुरक्षित राहिलेले नाहीत. अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा गावाजवळ एका सराफा व्यापाऱ्याला अडवून, त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून तब्बल ५ लाख ८५ हजार रुपयांचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एखाद्या सस्पेंस चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने हा दरोडा टाकण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात … Read more

“दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र…” विकासकामे रोखल्याच्या नैराश्यातून शिवसेना नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; साडी फाटली अन् अनर्थ टळला!

बीड: राजकारण आणि समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात. समाजाचे भले करण्यासाठी राजकारणात आलेला एखादा कार्यकर्ता जेव्हा याच व्यवस्थेच्या जाचाला कंटाळून स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतो, तेव्हा ती केवळ एका व्यक्तीची हार नसते, तर संपूर्ण व्यवस्थेची हार असते. बीड जिल्ह्यामध्ये नुकतीच अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. विकासकामे मोफत करण्याच्या इच्छेपोटी … Read more

बीड हादरले! आधी गाव अंधारात बुडवले, मग घर लुटले; ऊसतोड कामगाराची नऊ लाखांची कमाई आणि दागिने लंपास, पाटोदा तालुक्यातील थरार

बीड: बीड जिल्ह्याला गुन्हेगारीचे ग्रहण काही सुटता सुटेना झाले आहे. चोरी, दरोडे आणि खुनाच्या घटनांनी जिल्हा आधीच त्रस्त असताना, आता चोरांनी चोरीची एक नवीन आणि धक्कादायक पद्धत (Modus Operandi) वापरल्याचे समोर आले आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील जवळाला (Jawala) गावात चोरांनी सिनेमाला शोभेल असा थरार घडवून आणला. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी चक्क गावाचा वीजपुरवठा खंडित केला, गावातील … Read more

पालवण–लिंबागणेश रस्त्याचा १३ कोटींचा ‘खड्डेमार्क’ कारनामा! बेशरम कंत्राटदारांवर ग्रामस्थांचा अनोखा निषेध; ग्रामसडक योजना ‘राजकीय पोसणी’साठीच?

बीड लिंबागणेश (दि. ४ नोव्हेंबर) — मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बीड जिल्ह्यातील पालवण चौक ते लिंबागणेश हा २४ किलो मीटर लांबीचा रस्ता बनवण्यासाठी तब्बल १२ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. मात्र काही महिन्यांतच हा रस्ता उखडून खड्डेमय झाला आहे. या रस्त्याची दुर्दशा पाहून स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश … Read more

Beed News : केज मतदार संघात ३० ‘स्मार्ट अंगणवाडी’ प्रकल्पांना मंजुरी — आ. नमिता मुंडडा यांच्या प्रयत्नांना यश

महिला व बाल विकास विभागाकडून ५० लाखांचा निधी मंजूर; ग्रामीण बालविकास सेवांना मिळणार तांत्रिक बळ अंबाजोगाई (प्रतिनिधी) : केज विधानसभा मतदारसंघातील लहान बालकांच्या शिक्षण आणि पोषण क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणारा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला आहे. महिला व बाल विकास विभागाने “स्मार्ट अंगणवाडी किट” खरेदीस अखेर मंजुरी दिली असून, केज मतदारसंघातील ३० अंगणवाड्यांसाठी तब्बल … Read more

Beed News : लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी बीडकर रस्त्यावर — फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी कँडल मार्च

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघाला कँडल मार्च; दोषींवर कठोर कारवाईची मागणी बीड (प्रतिनिधी ) : फलटण येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सोमवारी बीडकरांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध व्यक्त केला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कँडल मार्च काढत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. “लेकीला न्याय … Read more

बीड जिल्ह्यात दुर्दैवी अपघात; अडीच वर्षांच्या आरोहीचा ट्रॅक्टरखाली मृत्यू – आईच्या कुशीतून निसटली चिमुकली

बीड प्रतिनिधी | Hello Beed न्यूज नेटवर्क बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ऊसतोड मजुरीसाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला पडला आहे. केवळ अडीच वर्षांची आरोही विशाल बडे ही चिमुकली ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून ठार झाल्याची दुर्दैवी घटना कर्नाटकातील कोल्हारजवळ रविवारी (दि. 26 ऑक्टोबर) सकाळी साडेदहा वाजता घडली. या घटनेने धारूर तालुक्यातील देवदहिफळ … Read more

बीड प्रशासनावर अजित पवारांचा संताप; “खासदारांच्या पत्रांना केराची टोपली”

बीड प्रतिनिधी | Hello Beed न्यूज नेटवर्क बीड जिल्हा प्रशासनावर आता वचकच राहिलेला नाही, अशा कठोर शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला सुनावले. खासदार आणि जनप्रतिनिधींच्या पत्रांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांनी “हे प्रशासन सुस्त झालंय, आता सुतासारखे सरळ करावे लागेल” असा इशारा दिला. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अजित … Read more

तलवाडा एसटी बसस्टँडमध्ये एखादा जीव गेल्यावरच एसटी महामंडळ जागे होणार का?

तलवाडा (ता. गेवराई) | हॅलो बीड प्रतिनिधी गेवराई तालुक्यातील सर्वात मोठं व व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचं गाव असलेल्या तलवाडा येथील एसटी बसस्टँडचा ‘पार्किंग ठिकाण’ म्हणून वापर सुरू झाल्याने प्रवासी आणि चालक त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायत मार्केटलगत असलेल्या दोन फ्लॉटफॉर्मयुक्त बसस्थानकात व्यापारी, बँक ग्राहक आणि वाहनधारक आपली खाजगी वाहने थेट स्टँडमध्ये उभी करतात, अशी गंभीर परिस्थिती निर्माण … Read more