पिंपळादेवीत सर्वत्र पाणी – मसनवाटा पाण्याखाली; वृद्धेच्या पार्थिवावर शेजारच्या गावात अंत्यसंस्कार

बीड : बीड तालुक्यातील पिंपळादेवी गावात पावसामुळे निर्माण झालेल्या पाणी साठ्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. गावातील घराघरांत पाणी शिरले असून शेती, रस्ते आणि मसनवाटा पाण्याखाली गेले आहेत. या परिस्थितीचे सर्वात वेदनादायक रूप आज पहाटे पाहायला मिळाले, जेव्हा गावातील एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झाले. मृतदेहावर गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती, कारण … Read more

धक्कादायक ! बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स जवळ यश ढाका नावाच्या युवकाची निर्घृण हत्या

बीड : बीड शहर पुन्हा एकदा हादरून गेले आहे. माने कॉम्प्लेक्स जवळील पान टपरीसमोर गुरुवारी रात्री उशिरा धारदार शस्त्राने हल्ला करून यश ढाका (वय अंदाजे २५) या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. यश हा बीड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा असल्याने पत्रकार वर्तुळासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेची सविस्तर माहिती माहितीनुसार, गुरुवारी … Read more

धनंजय मुंडे पुन्हा मंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरु झाली आहे. माहितीनुसार, कर्जत येथील … Read more

गोट्या गीतेसह पाच जणांवरील मोका रद्द – रघु फड, धनराज गित्ते यांच्यावर कारवाई कायम

बीड : परळी शहरात दोन वर्षांपूर्वी घडलेल्या सहदेव सातभाई यांच्यावर झालेल्या हल्ला व लूटमारीच्या प्रकरणाला मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात कुख्यात गुन्हेगार रघु फड याच्यासह सात जणांवर मकोका (Maharashtra Control of Organised Crime Act – MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, आता अपर पोलिस महासंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार टोळीतील गोट्या गीते याच्यासह पाच जणांवरील … Read more

बीड क्राईम : ग्रामसेवक दोन हजाराची लाच घेताना पकडला – केज पंचायत समितीत कारवाई

केज (प्रतिनिधी) :केज तालुक्यात आज दुपारी भ्रष्टाचाराविरोधात मोठी धडक कारवाई झाली. केकतसारणी गावचे ग्रामसेवक गंगाधर ठोंबरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई थेट केज पंचायत समितीच्या आवारात पार पडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तक्रारदार हा पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा लाभार्थी असून, घरकुलाचा दुसरा हप्ता मिळवण्यासाठी लागणाऱ्या … Read more

बीड क्राईम : मूकबधिर शाळेच्या शिक्षकाने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले

केज : केज तालुक्यातील सारणी गावात शुक्रवारी (दि. १९ सप्टेंबर) दुपारी घडलेल्या घटनेने सगळ्यांच्या मनाला चटका लावला आहे. गावातील ४६ वर्षीय शिक्षक अशोक नारायण भंडारे यांनी स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवलं. ही बातमी पसरताच गावात शोककळा पसरली. अशोक भंडारे हे उमरी फाटा येथील मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत शिक्षक होते. शांत, … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्र वाटप; मराठा बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण

बीड – मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून बीड जिल्ह्यात ऐतिहासिक असा कार्यक्रम पार पडला. बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मराठा समाजातील पात्र बांधवांना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिकांची, मराठा बांधवांची आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा समाजाच्या भावनांना … Read more

बीड रेल्वेवरून अजित पवारांचा टोला: “किती खासदार आले अन् गेले… पण रेल्वे आली नाही”

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हा रूग्णालयातील कॅथलॅबचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्यात त्यांनी कामाच्या गुणवत्तेवरून कंत्राटदारांना चांगलंच फैलावर घेतलं. दरवाजे नीट न बसवणे, रंगकामातील त्रुटी, लाईटची अडचण अशा बाबींवरून त्यांनी अधिकाऱ्यांचीही कानउघडणी केली आणि कामात सुधारणा न झाल्यास संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला. बीडच्या रेल्वेवरून माजी … Read more

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर कारवाईची मराठा संघटनांची मागणी; कायदेशीर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा

मुंबई : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वादग्रस्त विधानानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातील श्रृंगारवाडी (ता. गेवराई) येथे 13 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात हाके यांनी केलेल्या भाषणात दोन समाजात वैर वाढवणारे, तसेच सार्वजनिक शांतता बिघडवणारे विधान केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने केला आहे. या संदर्भात … Read more

आष्टी तालुक्यातील तरुण प्रवीण सोनवणे कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाख रुपयांची मदत

आष्टी, बीड (दि. १७ सप्टेंबर २०२५) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपले जीवन संपवणाऱ्या आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील तरुण प्रवीण दिलीप सोनवणे यांच्या कुटुंबाला अखेर शासनाकडून मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मदत मिळाली आहे. या मदतीचा धनादेश (चेक) दहा लाख रुपयांचा प्रवीण सोनवणे यांच्या मातोश्री सुनंदा दिलीप सोनवणे यांच्याकडे आष्टी येथील तहसील कार्यालयात आमदार सुरेश धस … Read more