बीड अपघात : ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरने दिली मोटारसायकलला धडक; २ गंभीर, एकाची प्रकृती चिंताजनक

केज (बीड) : केज-कळंब रोडवरील साळेगावजवळ रविवारी (दि. २६ ऑक्टोबर) रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. हा अपघात ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेमुळे झाला. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष ठोंबरे आणि सुरज काकडे (मोटारसायकल क्रमांक एमएच-४४/वाय-२५७७) हे दोघे साळेगावकडून केजच्या दिशेने जात होते. … Read more

बीड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच; १८ महसूल मंडलात अतिवृष्टी, नद्यांना पूर – अनेक गावांचा संपर्क तुटला

बीड : बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेला पाऊस शनिवारी सकाळपर्यंत कायम राहिला. दोन तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. प्रशासनाने जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील बिंदुसरा, कुंडलिका, … Read more

बीड क्राईम : ग्रामसेवक दोन हजाराची लाच घेताना पकडला – केज पंचायत समितीत कारवाई

केज (प्रतिनिधी) :केज तालुक्यात आज दुपारी भ्रष्टाचाराविरोधात मोठी धडक कारवाई झाली. केकतसारणी गावचे ग्रामसेवक गंगाधर ठोंबरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई थेट केज पंचायत समितीच्या आवारात पार पडल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तक्रारदार हा पंतप्रधान आवास घरकुल योजनेचा लाभार्थी असून, घरकुलाचा दुसरा हप्ता मिळवण्यासाठी लागणाऱ्या … Read more

बीड क्राईम : मूकबधिर शाळेच्या शिक्षकाने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले

केज : केज तालुक्यातील सारणी गावात शुक्रवारी (दि. १९ सप्टेंबर) दुपारी घडलेल्या घटनेने सगळ्यांच्या मनाला चटका लावला आहे. गावातील ४६ वर्षीय शिक्षक अशोक नारायण भंडारे यांनी स्वतःच्या शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवलं. ही बातमी पसरताच गावात शोककळा पसरली. अशोक भंडारे हे उमरी फाटा येथील मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेत शिक्षक होते. शांत, … Read more