Beed Railway : बीडला मिळाली पहिली रेल्वे, फडणवीसांचा मोठा शब्द – “ही रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण”

बीड : मराठवाड्यातील बीड जिल्ह्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. दशकानुदशकं प्रतीक्षा असलेले स्वप्न अखेर पूर्ण झाले आणि बीड शहरात पहिल्यांदाच रेल्वेचा शिट्टीचा आवाज घुमला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते बीड- अहिल्यानगर रेल्वे मार्गावर गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ही केवळ रेल्वे नाही तर बीडच्या … Read more

बीड रेल्वेवरून अजित पवारांचा टोला: “किती खासदार आले अन् गेले… पण रेल्वे आली नाही”

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हा रूग्णालयातील कॅथलॅबचे उद्घाटन केले. उद्घाटन सोहळ्यात त्यांनी कामाच्या गुणवत्तेवरून कंत्राटदारांना चांगलंच फैलावर घेतलं. दरवाजे नीट न बसवणे, रंगकामातील त्रुटी, लाईटची अडचण अशा बाबींवरून त्यांनी अधिकाऱ्यांचीही कानउघडणी केली आणि कामात सुधारणा न झाल्यास संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला. बीडच्या रेल्वेवरून माजी … Read more

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर कारवाईची मराठा संघटनांची मागणी; कायदेशीर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा

मुंबई : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वादग्रस्त विधानानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. बीड जिल्ह्यातील श्रृंगारवाडी (ता. गेवराई) येथे 13 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यात हाके यांनी केलेल्या भाषणात दोन समाजात वैर वाढवणारे, तसेच सार्वजनिक शांतता बिघडवणारे विधान केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा आणि अखिल भारतीय मराठा महासंघाने केला आहे. या संदर्भात … Read more

आष्टी तालुक्यातील तरुण प्रवीण सोनवणे कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाख रुपयांची मदत

आष्टी, बीड (दि. १७ सप्टेंबर २०२५) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपले जीवन संपवणाऱ्या आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील तरुण प्रवीण दिलीप सोनवणे यांच्या कुटुंबाला अखेर शासनाकडून मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मदत मिळाली आहे. या मदतीचा धनादेश (चेक) दहा लाख रुपयांचा प्रवीण सोनवणे यांच्या मातोश्री सुनंदा दिलीप सोनवणे यांच्याकडे आष्टी येथील तहसील कार्यालयात आमदार सुरेश धस … Read more

बीड: उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ताफ्या समोर दोन तरुणांनी आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांनी त्वरित रोखले

बीड (दि. १७ सप्टेंबर २०२५) – बीड जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना घडली, जिथे दोन तरुणांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या ताफ्या समोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटना बुधवारी (दि. १७) घडली, जेव्हा उपमुख्यमंत्री पवार जिल्ह्यातील दौऱ्यावर होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, तरुणांनी पेट्रोल ओतून स्वतःवर उधळून आणि “Give Us Justice Ajit Dada” … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेवराई तालुक्यातील पुरग्रस्त भागाची पाहणी केली

गेवराई (दि. १७ सप्टेंबर २०२५) – राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी बुधवारी गेवराई विधानसभा मतदार संघातील पुरग्रस्त भागाची पाहणी करून शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. तालुक्यातील खामगाव, नागझरी, सावळेश्वर, म्हाळस पिंपळगाव आणि गंगावाडी शिवारातील प्रभावित शेतकरी आणि स्थानिक नागरिकांशी त्यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन … Read more

आयुष्मान योजना: महाराष्ट्रात आरोग्यसेवेत क्रांतिकारक बदल, 2399 नवीन पॅकेजेसची मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक बैठक; राज्याच्या आरोग्यसेवेचा नवा मार्गदर्शन महाराष्ट्रातील आरोग्यसेवेला नवी दिशा देणारी एक ऐतिहासिक बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत) आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांचा समावेश करून राज्याच्या आरोग्य धोरणात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले. मुख्य उद्देश हा … Read more

मोदींनी दिलेला शब्द पूर्णत्वास – आजपासून बीड -नगर रेल्वे धावणार, बीडमध्ये येणार पहिली रेल्वे.

बीड : बीडकरांचे अनेक दशकांचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. नगर-बीड रेल्वे मार्गावर आजपासून रेल्वे धावणार असून पहिल्यांदाच रेल्वे बीड शहरात प्रवेश करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये दिलेले वचन पूर्णत्वास नेले आहे. हिरवा झेंडा बीड मध्ये, पहिली रेल्वे बीडमध्ये येणारबीड येथून हिरवा झेंडा दाखवून रेल्वे प्रवासाची सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, … Read more

बीडला पावसाचा तडाखा! आष्टी तालुक्यात पूरस्थिती, अनेक गावं पाण्याखाली; शाळांना सुट्टी

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या पश्चिम भागात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत, पूल पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि जिल्हा प्रशासनाकडून शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. गर्भगिरी रांगांवर मुसळधार पाऊसआष्टी तालुक्यातील गर्भगिरी डोंगररांगा आणि पश्चिमेकडील गावांमध्ये … Read more

“उद्या पासून आवाज येणार – आगला स्टेशन… बीड!”

बीड – डॉ .अमर नागरे आपण आज वर लोकाच्या जिल्ह्यामध्ये जाऊन आगला स्टेशन… जालना ,परभणी ,पुणे ,मुंबई असे एकले पण. ” उद्या पासून आवाज येणार – आगला स्टेशन… बीड!” तीन पिढ्यांची प्रतीक्षा संपली! उद्या १७ सप्टेंबरपासून रेल्वेवर ऐकू येणार “आगला स्टेशन… बीड!” बीड जिल्ह्यातील लोकांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. हा क्षण केवळ एक घोषणा … Read more