हॅलो बीड ग्रूप जॉईन करा

बीड अपघात : ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरने दिली मोटारसायकलला धडक; २ गंभीर, एकाची प्रकृती चिंताजनक

On: October 27, 2025 6:46 AM
Follow Us:

केज (बीड) :

केज-कळंब रोडवरील साळेगावजवळ रविवारी (दि. २६ ऑक्टोबर) रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. हा अपघात ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेमुळे झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष ठोंबरे आणि सुरज काकडे (मोटारसायकल क्रमांक एमएच-४४/वाय-२५७७) हे दोघे साळेगावकडून केजच्या दिशेने जात होते. दरम्यान, साळेगावजवळील तेलंग आणि दत्तात्रय आरडकर यांच्या शेताजवळील पुलावरून जात असताना, कळंबच्या दिशेने येणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी होती की मोटारसायकलवरील नियंत्रण सुटून त्यांनी पुढे चाललेल्या शिवानंद स्वामी यांच्या मोटारसायकललाही धडक दिली. त्यामुळे अपघाताचा आवाज परिसरात पसरला आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले.

या अपघातात संतोष ठोंबरे आणि सुरज काकडे गंभीर जखमी झाले असून, सुरज काकडे यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे. रक्तस्त्राव जास्त प्रमाणात झाल्याने त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर शिवानंद स्वामी यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघातानंतर नागरिकांनी तातडीने मदतीसाठी पुढे सरसावले. या घटनेची माहिती मिळताच पुढारीचे केज प्रतिनिधींनी रुग्णवाहिकेसाठी तातडीने संपर्क साधला. त्यानंतर वळसे पाटील यांच्या दोन खाजगी रुग्णवाहिकांच्या मदतीने गंभीर जखमींना तात्काळ केज उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला असल्याचे सांगितले जाते. पोलीसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

स्थानिक नागरिकांनी अपघाताच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रित करत रुग्णांना वेळेत मदत केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा  "रोज धमक्या येतात, कधी कोण येऊन माझा मुडदा पाडेल सांगता येत नाही..."; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट अन् मोठी घोषणा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now