हॅलो बीड ग्रूप जॉईन करा

बीड जिल्ह्यात दुर्दैवी अपघात; अडीच वर्षांच्या आरोहीचा ट्रॅक्टरखाली मृत्यू – आईच्या कुशीतून निसटली चिमुकली

On: October 27, 2025 3:17 PM
Follow Us:

बीड प्रतिनिधी | Hello Beed न्यूज नेटवर्क

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ऊसतोड मजुरीसाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला पडला आहे. केवळ अडीच वर्षांची आरोही विशाल बडे ही चिमुकली ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून ठार झाल्याची दुर्दैवी घटना कर्नाटकातील कोल्हारजवळ रविवारी (दि. 26 ऑक्टोबर) सकाळी साडेदहा वाजता घडली.

या घटनेने धारूर तालुक्यातील देवदहिफळ गावात हळहळ व्यक्त होत आहे. आरोही ही महादेव बडे यांची नात आणि विशाल बडे यांची मुलगी होती. ऊसतोडीच्या कामासाठी संपूर्ण कुटुंब कर्नाटकाकडे रवाना झाले होते. मात्र प्रवासादरम्यान काही क्षणांतच कुटुंबाच्या आनंदी प्रवासाचे दुःखद स्वप्नात रूपांतर झाले.

कुटुंबाचा प्रवास आणि भीषण क्षण

देवदहिफळ येथील महादेव बडे हे ऊसतोड मुकादम असून, त्यांचा मुलगा विशाल बडे कर्नाटकातील बैलहोंगल तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतुकीचे काम पाहतो. शुक्रवारी रात्री विशाल बडे हे पत्नी आरती, मुलगा अविराज आणि मुलगी आरोहीसह ट्रॅक्टरने कामासाठी निघाले होते.

रविवार सकाळी कोल्हार येथे थांबून चहा-नाश्ता करून ते पुन्हा कारखान्याच्या दिशेने निघाले. त्या वेळी आरोही ही आईच्या कुशीत समोरील ट्रॉलीत बसली होती. प्रवासादरम्यान अचानक ट्रॉलीला धक्का बसल्याने आरोही आईच्या हातातून निसटली आणि मागच्या ट्रॉलीच्या चाकाखाली आली.

काळीज पिळवटणारा क्षण

क्षणातच ट्रॉलीच्या चाकाखाली आलेल्या आरोहीचा जागीच मृत्यू झाला. या भीषण घटनेनंतर आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. काही क्षणात त्यांच्या डोळ्यांसमोर एकुलती एक लेक निघून गेली.

घटनेनंतर आरोहीला कोल्हार येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शवविच्छेदनानंतर रविवारी मध्यरात्री देवदहिफळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

स्थलांतरित मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

दरवर्षी बीड, धारूर आणि परभणी परिसरातून हजारो मजूर ऊसतोडीसाठी कर्नाटक, सांगली आणि कोल्हापूरकडे स्थलांतर करतात. अनेकदा अशा प्रवासादरम्यान मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघात घडत आहेत.

या घटनेनंतर ऊसतोड मजुरांच्या स्थलांतराच्या काळात मुलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

देवदहिफळ गावात रविवारी रात्री बडे कुटुंबाच्या घरी शोककळा पसरली होती. नातेवाईक, गावकरी आणि परिसरातील लोकांनी हळहळ व्यक्त करत कुटुंबाला धीर दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

ताज्या बातम्या

“रोज धमक्या येतात, कधी कोण येऊन माझा मुडदा पाडेल सांगता येत नाही…”; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट अन् मोठी घोषणा!

“दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र…” विकासकामे रोखल्याच्या नैराश्यातून शिवसेना नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; साडी फाटली अन् अनर्थ टळला!

‘फरार कृष्णा आंधळे गावात येऊन गेला!’; संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा

पुढील 24 तास धोक्याचे, मराठवाड्यात थंडीची लाट येणार, बीड जिल्ह्याला यलो अलर्ट

बीडच्या राजकारणात मोठा धक्का: डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला

‘मॅट्रिमोनिअल वेबसाईट’वर ओळख; छत्रपती संभाजीनगरला बोलावलं आणि… बीडच्या महिलेसोबत भयंकर घडलं