हॅलो बीड ग्रूप जॉईन करा

मोदींनी दिलेला शब्द पूर्णत्वास – आजपासून बीड -नगर रेल्वे धावणार, बीडमध्ये येणार पहिली रेल्वे.

On: September 17, 2025 5:02 AM
Follow Us:

बीड : बीडकरांचे अनेक दशकांचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. नगर-बीड रेल्वे मार्गावर आजपासून रेल्वे धावणार असून पहिल्यांदाच रेल्वे बीड शहरात प्रवेश करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये दिलेले वचन पूर्णत्वास नेले आहे.

हिरवा झेंडा बीड मध्ये, पहिली रेल्वे बीडमध्ये येणार
बीड येथून हिरवा झेंडा दाखवून रेल्वे प्रवासाची सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. बीडमध्ये नागरिक या पहिल्या रेल्वेचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. स्टेशन परिसरात स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी, फुलांनी सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचीही तयारी सुरू आहे.आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि हा बीडकर साठी आनदाचा दिवस ठरला .

बीडकरांसाठी ऐतिहासिक क्षण
बीड हा राज्यातील रेल्वे नसलेला जिल्हा म्हणून ओळखला जात होता. आता मात्र बीडकरांना थेट नगर, पुणे, नाशिक, मुंबई तसेच इतर शहरांशी रेल्वेने संपर्क मिळणार आहे. हा मार्ग सुरू झाल्याने व्यापार, शिक्षण आणि उद्योग क्षेत्राला नवी दिशा मिळणार आहे.

मोदींची घोषणा सत्यात
२०१९ मध्ये मोदी बीड दौऱ्यावर आले होते आणि “माझे मित्र गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न मी पूर्ण करेन” असे सांगितले होते. आज ती घोषणा सत्यात उतरत असून सोशल मीडियावर या घोषणांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

बीडमध्ये जल्लोष
शहरातील नागरिक रेल्वेच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. स्थानकावर मोठ्या प्रमाणावर नागरिक, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांची गर्दी होणार आहे.

१७ सप्टेंबरला नियमित सेवा
आज उद्घाटन सोहळ्यानंतर १७ सप्टेंबरपासून नियमित रेल्वे सेवा सुरू होणार आहे. “आगला स्टेशन… बीड!” हा आवाज ऐकण्यासाठी नागरिक आतुर आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

ताज्या बातम्या

“रोज धमक्या येतात, कधी कोण येऊन माझा मुडदा पाडेल सांगता येत नाही…”; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट अन् मोठी घोषणा!

“दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र…” विकासकामे रोखल्याच्या नैराश्यातून शिवसेना नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; साडी फाटली अन् अनर्थ टळला!

‘फरार कृष्णा आंधळे गावात येऊन गेला!’; संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा

पुढील 24 तास धोक्याचे, मराठवाड्यात थंडीची लाट येणार, बीड जिल्ह्याला यलो अलर्ट

बीडच्या राजकारणात मोठा धक्का: डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला

‘मॅट्रिमोनिअल वेबसाईट’वर ओळख; छत्रपती संभाजीनगरला बोलावलं आणि… बीडच्या महिलेसोबत भयंकर घडलं

Leave a Comment