हॅलो बीड ग्रूप जॉईन करा

‘मॅट्रिमोनिअल वेबसाईट’वर ओळख; छत्रपती संभाजीनगरला बोलावलं आणि… बीडच्या महिलेसोबत भयंकर घडलं

On: November 9, 2025 12:57 PM
Follow Us:

बीड | प्रतिनिधी
ऑनलाइन मॅट्रिमोनिअल वेबसाईटवरून झालेली ओळख बीड जिल्ह्यातील एका घटस्फोटीत महिलेसाठी जीवघेणी ठरली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका हॉटेल मॅनेजरने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, बीड जिल्ह्यातील 36 वर्षीय पीडित महिला स्वाती (नाव बदललेले) हिचे वैवाहिक जीवन 2016 साली तणावात आले आणि त्यानंतर ती विभक्त राहू लागली. योग्य जीवनसाथीच्या शोधात ती 2019 मध्ये एका लोकप्रिय मॅट्रिमोनिअल संकेतस्थळावर सक्रिय झाली. त्याचदरम्यान तिची ओळख छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल मॅनेजर भूषण गायधनी याच्याशी झाली.

प्रारंभी दोघांमध्ये नियमित संपर्क सुरू झाला. भूषणने लग्नाचे आश्वासन देत स्वातीला छत्रपती संभाजीनगर येथे बोलावले. मात्र येथे आल्यानंतर त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. पुढील काही महिन्यांमध्येही तो सतत लग्नाचे आश्वासन देत संबंध ठेवत होता. नंतर महिलेचा गर्भधारणा झाल्याचे समजल्यावर, तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडले, असेही तिने पोलिसांना सांगितले आहे.

घडलेल्या प्रकाराने हादरलेल्या पीडितेने अखेर धैर्य एकवटत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भूषण गायधनी याच्याविरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि धमकी या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला असून, मॅट्रिमोनिअल वेबसाईट्सवर ओळखी करताना महिलांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

ताज्या बातम्या

“रोज धमक्या येतात, कधी कोण येऊन माझा मुडदा पाडेल सांगता येत नाही…”; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट अन् मोठी घोषणा!

“दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र…” विकासकामे रोखल्याच्या नैराश्यातून शिवसेना नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; साडी फाटली अन् अनर्थ टळला!

‘फरार कृष्णा आंधळे गावात येऊन गेला!’; संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा

पुढील 24 तास धोक्याचे, मराठवाड्यात थंडीची लाट येणार, बीड जिल्ह्याला यलो अलर्ट

बीडच्या राजकारणात मोठा धक्का: डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला

‘गोल्ड लोन’ योजनेत खोटं सोनं गहाण; दोन महिन्यांत अडीच कोटींचा घोटाळा, बीडच्या सोनाराला पुण्यातून अटक