हॅलो बीड ग्रूप जॉईन करा

बीड हादरले! भावकीतील लोकांनी घरात घुसून कुटुंबावर हल्ला

On: October 30, 2025 5:01 PM
Follow Us:

बीड, दि. ३० ऑक्टोबर: बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही. किरकोळ कारणावरून होणाऱ्या हाणामाऱ्या, कौटुंबिक वादातून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांनी जिल्हा हादरलाय. ताज्या घटनेत परळी तालुक्यातील हेळंब गावात भावकीतील लोकांनी एका कुटुंबावर घरात घुसून जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात वडील व तीन मुलांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली, तर मुलीला विष पाजल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे.

नेमकं घडलं काय?

पीडित वडील वासुदेव विक्रम आंधळे यांनी सांगितले की,

“मारहाण करणाऱ्या लोकांवर याआधीच छेडछाड आणि मारहाण प्रकरणात केस दाखल होती. त्यांनी ती केस मागे घे नाहीतर जीव घेऊ असा धमकीचा पवित्रा घेत, कुऱ्हाडीच्या दांड्यांनी आणि काठ्यांनी आम्हा सर्वांना मारहाण केली. एका मुलीला विष पाजलं, तर दुसऱ्या मुलीला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली.”

या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चार-पाच जण घरात घुसून वडिलांना मारहाण करताना, मुलगी मध्ये पडल्यावर तिलाही निर्दयपणे ढकलून मारताना या व्हिडिओत दिसतंय. परिसरात किंकाळ्यांचा गजर होत असतानाही कोणीच धाडसाने पुढे आलं नाही.

पोलिस ठाण्याने दिली नाही दाद

मारहाणीनंतर पीडित कुटुंब पोलिस ठाण्यात धावले, मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केली. शेवटी वडील आंधळे यांनी न्याय मिळावा म्हणून पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली, पण त्यांनाही “अंबाजोगाईला जा” असं सांगण्यात आलं.

निराश झालेल्या या कुटुंबाने आता पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांना न्यायासाठी आर्त हाक दिली आहे.

दुसरी घटना: हॉटेल कामगारावर गुंडांचा हल्ला

बीड शहरातही गुंडगिरीचा कहर सुरूच आहे. एका हॉटेलवर पाच जणांच्या टोळक्याने हल्ला चढवून कामगाराला लोखंडी रॉड आणि दांडक्यांनी मारहाण केली. यात कामगाराचा पाय फ्रॅक्चर झाला असून उपचार जिल्हा रुग्णालयात सुरू आहेत.

या प्रकरणात करण पवार, दिलीप पवार आणि अभिषेक खाडे यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न (Section 307) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी पूर्वीपासून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे पण वाचा  "रोज धमक्या येतात, कधी कोण येऊन माझा मुडदा पाडेल सांगता येत नाही..."; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट अन् मोठी घोषणा!

नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

सलग वाढणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांमुळे बीड जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, प्रशासनाने ठोस कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

ताज्या बातम्या

“रोज धमक्या येतात, कधी कोण येऊन माझा मुडदा पाडेल सांगता येत नाही…”; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट अन् मोठी घोषणा!

“दादा मला माफ करा, शेवटचा जय महाराष्ट्र…” विकासकामे रोखल्याच्या नैराश्यातून शिवसेना नेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; साडी फाटली अन् अनर्थ टळला!

‘फरार कृष्णा आंधळे गावात येऊन गेला!’; संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांचा खळबळजनक दावा

पुढील 24 तास धोक्याचे, मराठवाड्यात थंडीची लाट येणार, बीड जिल्ह्याला यलो अलर्ट

बीडच्या राजकारणात मोठा धक्का: डॉ. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला

‘मॅट्रिमोनिअल वेबसाईट’वर ओळख; छत्रपती संभाजीनगरला बोलावलं आणि… बीडच्या महिलेसोबत भयंकर घडलं