बीड – डॉ .अमर नागरे
आपण आज वर लोकाच्या जिल्ह्यामध्ये जाऊन आगला स्टेशन… जालना ,परभणी ,पुणे ,मुंबई असे एकले पण. ” उद्या पासून आवाज येणार – आगला स्टेशन… बीड!” तीन पिढ्यांची प्रतीक्षा संपली! उद्या १७ सप्टेंबरपासून रेल्वेवर ऐकू येणार “आगला स्टेशन… बीड!” बीड जिल्ह्यातील लोकांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
हा क्षण केवळ एक घोषणा नसून बीड जिल्ह्याच्या विकासाचा नवा टप्पा आहे. बीडला रेल्वेने जोडण्याचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. जनआंदोलने, मार्ग काढण्यासाठी केलेले प्रयत्न, लोकप्रतिनिधींची धडपड आणि नागरिकांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा – या सर्वांचा परिपाक उद्या साकार होतो आहे.
उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी
रेल्वे स्थानक परिसरात सर्व कामे पूर्ण झाली असून उद्घाटन सोहळ्यासाठी विशेष सजावट करण्यात आली आहे. स्टेशनवर स्वागत कमानी उभारल्या आहेत, परिसर लाईटिंगने उजळला आहे. उद्घाटनासाठी केंद्रीय आणि राज्यस्तरीय मान्यवर येणार असून जिल्हावासीयांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.
बीडकरांमध्ये उत्सवाचे वातावरण
बीड शहरात आणि जिल्हाभर आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर रेल्वे स्टेशनचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. नागरिक स्टेशन परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. मुलांना घेऊन कुटुंबीय स्टेशनवर येत आहेत आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज आहेत.
विकासाची नवी दारे उघडणार
रेल्वे सुरू झाल्यानंतर प्रवास सोपा आणि स्वस्त होणार आहे. शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि रुग्ण यांना मोठा दिलासा मिळणार आहे. औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळेल आणि जिल्ह्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. पर्यटन क्षेत्रालाही गती मिळणार आहे.
इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा क्षण
ज्येष्ठ नागरिक सांगतात की त्यांच्या वडिलांनी आणि आजोबांनी रेल्वेसाठी लढा दिला होता. आज त्यांच्या मुला-नातवंडांना ते स्वप्न साकारताना पाहण्याचा आनंद होत आहे. उद्या जेव्हा रेल्वेतून आवाज येईल – “आगला स्टेशन… बीड!” – तेव्हा प्रत्येक बीडकराचा अभिमान दुणावेल.
या उद्या च्या आवाज साठी सर्वांनी जो लढा दिला त्या बदल हॅलो बीड त्या सर्व मान्यवरांच आभार आहोत.
१७ सप्टेंबरचा दिवस बीड जिल्ह्यासाठी केवळ एक तारीख राहणार नाही तर इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा क्षण ठरणार आहे. उद्या पासून बीड जिल्हा भारताच्या रेल्वे नकाशावर दृढपणे उमटणार आहे आणि जिल्ह्याच्या प्रगतीची नवी वाट खुली होणार आहे.








