हॅलो बीड ग्रूप जॉईन करा

सिंदफणा नदीचे रौद्ररूप! शिरूर (का ) बाजारात विक्रमी महापूर, व्यापाऱ्यांचे लाखोचे नुकसान

On: September 22, 2025 4:53 AM
Follow Us:

शिरूर कासार : बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून नद्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे सिंदफणा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. नदीच्या पाण्याचा जोर एवढा होता की शिरूर कासार शहरातील बाजार तळ भागात पाणी शिरले. पाणी एवढ्या वेगाने आले की व्यापाऱ्यांना आपापले दुकानातील माल वाचवण्याची संधीही मिळाली नाही. परिणामी अनेक दुकानातील साहित्य, धान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, किराणा व इतर साहित्य पाण्यात भिजून गेले किंवा वाहून गेले आहे.स्थानिक व्यापारी संघटनेने सांगितले की, मागील दहा वर्षांमध्ये असा महापूर शिरूर बाजाराने पाहिलेला नव्हता. शनिवारी रात्री उशिरापर्यंत व्यापार सुरू होता; मात्र रविवारी पहाटे अचानक पाण्याचा लोंढा शहरात घुसला. पहाटेच्या सुमारास नागरिकांनी एकमेकांना सतर्क केले व दुकानदारांनी घाईघाईत दुकानातील काही महत्वाच्या वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत पाण्याचा स्तर कमरेपर्यंत पोहोचला होता..सिंदफणा नदीवरील हा महापूर हा नैसर्गिक आपत्तीच्या स्वरूपातच पाहावा लागेल, असे नागरिक सांगतात. व्यापाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हे पण वाचा  "रोज धमक्या येतात, कधी कोण येऊन माझा मुडदा पाडेल सांगता येत नाही..."; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक गौप्यस्फोट अन् मोठी घोषणा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

ताज्या बातम्या

Leave a Comment